बुधवार, २३ जानेवारी, २०१९

गुलाबराव महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा मिळाली


गुलाबराव महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा मिळाली

            - गिरीश बापट
Ø  विश्व अध्यात्म विज्ञान केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण
अमरावतीदि. २१ : संत श्री गुलाबराव महाराजांनी १३४ पुस्तके लिहिली आहेत. दृष्टी नसूनही त्यांचे विचार जगातील विचारांचे समन्वय साधणारे आहे. आज त्यांच्या भूमीत येऊन विचाराची प्रेरणा मिळाली आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केले.
चांदूर बाजार येथील संत गुलाबराव महाराज सेवा संस्था येथे आयोजित विश्व अध्यात्म विज्ञान केंद्रभक्तिधाम विकास आराखड्यातील कामांचा भूमीपूजन आणि स्वच्छतेचा जागर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बच्चू कडूउन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष डॉ. विजय भटकरसंस्थेचे अध्यक्ष मनोहर किरक्कटेडॉ. अर्चना बारब्दे उपस्थित होते.
श्री. बापट म्हणालेगुलाबराव महाराजांच्या चरित्राचा माझ्यावर प्रभाव राहिला आहे. त्यांच्या अलौकिक विचारांचा प्रभाव जागतिक पातळीवर आहे. एक समन्वयी विचार म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यांना दिसत नसूनही त्यांनी समन्वयी विचार मांडून दृष्टी असल्याचे दाखवून दिले. त्यांचे विचार जगभरात जाण्यासाठी संस्थेने त्यांचे मंदिर ज्ञान केंद्र होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेतही प्रशंसनीय बाब आहे. याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ज्ञानकेंद्रात येणारा प्रत्येक जण महाराजांचे विचार शिकून जाईलत्याच्या जीवनात क्रांती घडून येईल.
महाराजांचे विचार पोहचविण्यासाठी पंढरपूर येथे जागा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पुणे येथील जागेबाबत लवकरच निर्णय होणार आहे. कायमस्वरूपी जागा मिळाल्यामुळे महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे ही आपल्यावरील जबाबदारी आहे. महाराजांनी सर्वसामान्यांच्या विकासाची जी जाण ठेवली आहेत्या दृष्टीने कार्य करण्यात येणार असल्याचे श्री. बापट यांनी सांगितले.
महाराजांचे विचार सर्व विचारांचे समन्वय साधणारे
जगात विविध विचारधारा आहेत. या सर्व विचारांचे समन्वय साधणारे विचार हे गुलाबराव महाराजांचे विचार आहेत, असे मत डॉ. भटकर यांनी व्यक्त केले.
भौतिक सुखाची पातळी गाठल्यानंतर मनुष्य आध्यात्मिक सुखाकडे वळतो. त्यामुळे येत्या काळात आध्यात्मिक आधिष्ठान असलेल्या भारताकडे जग आशेने पाहणार आहे. सर्व विचारधारांचा समन्वय साधणे हे केवळ महाराजांच्या विचारात असल्याने तत्त्वज्ञान समजावून घेण्यासाठी जगभरातील अभ्यासक या ठिकाणी येतील. त्या दृष्टीकोनातून या ठिकाणी वाङमय केंद्राची निर्मिती होणार आहे. महाराजांनी 14 हजार पानांमधून समन्वयाचे तत्वज्ञान मांडले. म्हणूनच त्यांना समन्वय ऋषी म्हटल्या जाते. या ऋषी आणि कृषी संस्कृती असलेल्या देशात कृषीवर आधारीत उद्योग सुरू होऊन यातून रोजगार निर्माण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार बच्चू कडू यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य रविंद्र देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री. बापट यांनी विश्व अध्यात्म विज्ञान केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण करून भक्तिधाम विकास आराखड्यातील कामांचे भूमीपूजन केले.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा