शिक्षणमंत्री विनोद तावडे गुरुवारी अमरावतीत
अमरावती, दि.3 : शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे हे
उद्यापासून (दि. 3) शुक्रवारपर्यंत (दि. 4) अमरावती दौ-यावर आहेत.
त्यांचा दौरा
पुढीलप्रमाणे : गुरुवार, दि. 3 रोजी दुपारी 4.30 वाजता वर्धा येथून मोटारीने
अमरावतीकडे प्रयाण, सायंकाळी 7 वाजता हनुमान व्यायामशाळा येथे क्रीडा क्षेत्रातील
मान्यवरांशी संवाद, रात्री 8.30 वाजता श्री. दिनेश सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी
भेट (शिक्षक कॉलनी, प्रशांतनगरजवळ, अमरावती).
शुक्रवार, दि. 4 रोजी सकाळी 9 वाजता शिवाजी
शिक्षण संस्थेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद, सकाळी 11.15 वाजता स्व.
माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेला भेट, सकाळी 11.30 वाजता
विदर्भ शासकीय महाविद्यालयाच्या मजलिस सभागृहाचे उद्घाटन, सकाळी 11.45 वाजता
विदर्भ शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संवाद, दुपारी 1.15 वाजता सामाजिक
संस्थांच्या कार्यकर्त्यांसोबत अनौपचारिक संवाद, दुपारी 2 वाजता श्री संत
गाडगेबाबा अमरावती विद्यापीठास भेट, सायंकाळी 5 वाजता अमरावती येथून मोटारीने
नागपूरकडे प्रयाण.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा