तंत्रशिक्षण विभागीय क्रिडा
महोत्सवाचे थाटात उद्घाटन
अमरावती दि.28 : सहसंचालक, तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय, अमरावती यांचेवतीने दि 18 व 19 जानेवारी रोजी अमरावती विभागातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतनांमधील अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. क्रिडा महोत्सवादरम्यान पुरुष व महीला स्पर्धकांसाठी क्रिकेट,व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, बुदिधबळ व कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
क्रिडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शासकीय तंत्रनिकेतन, अमरावतीच्या भव्य सभागृहात संपन्न झाला. क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन सहसंचालक, (तंत्रशिक्षण) डॉ.डी.व्ही.जाधव यांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी उद्बोधन करतांना सहसंचालक डॉ. जाधव यांनी क्रिडा महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व पुरुष व महीला स्पर्धकांचे अभिनंदन करुन त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. जय पराजय महत्वाचा नसुन क्रिडा महोत्सवामुळे खिलाडू वृत्ती व सांघिक भावना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वृद्धिंगत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. पी. मोगरे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. आ.पी.मोगरे अमरावती यांनी केले. उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधुन तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय, अमरावती यांच्या नुतनीकरण केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटनही डॉ. डी. व्ही. जाधव यांचे हस्ते करण्यात आले व संकेतस्थळाचे नुतनीकरण करण्यासाठी भरीव योगदान देणार शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ येथील प्रा. येन्डे यांचा सत्कार सहसंचालकांचे हस्ते करण्यात आला.
विभागीय एन. बी. ए. नामांकन प्राप्त करणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथील संबंधित विभागांचे विभागप्रमुख सर्वश्री प्रा. एस. पी. पासेबंद, डॉ. एस. पी. बाजड, प्रा. डी. आर. गावंडे व एन. बी. ए. समन्वयक डॉ. एन. जी. कुळकर्णी तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथील संबंधित विभागांचे विभागप्रमुख सर्वश्री प्रा. यु. एम. थोरकर व प्रा. ए. एम. महल्ले व एन. बी. ए. समन्वयक डॉ. एस. पी. ताटेवार यांचा सहसंचालकांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व स्पर्धकांना क्रिडा प्रतिज्ञा प्रा. आर. के. परघणे यांनी दिली. व्यासपिठावर अमरावती विभागातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतनांचे प्राचार्य उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याचे संचलन प्रा. श्रीकांत काळीकर यांनी केले तर आभारप्रदर्शन सहाय्यक संचालक डॉ. एम. ए. अली यांनी केले. सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव यांचे हस्ते बुध्दिबळ खेळून स्पर्धेचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले. क्रिडा स्पर्धा शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आल्या होत्या.
क्रिडा स्पर्धामध्ये शासकीय तंत्रनिकेतन, वाशिमच्या चमुने पुरुष क्रिकेट, पुरुष टेबल टेनिस व पुरुष बुध्दिबळ या स्पर्धामध्ये विजेतेपद प्राप्त केले. शासकीय तंत्रनिकेतन, अमरावतीच्या चमुने महीला क्रिकेट व महीला व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद तर पुरुष कॅरम स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीची चमु पुरुष व्हॉलीबॉल, पुरुष टेबल टेनिस व महीला टेबल टेनिस स्पर्धामध्ये उपविजेती ठरली. शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळच्या चमुने महीला टेबल टेनिस व महिला बुध्दीबळ, महिला कॅरम व पुरुष कॅरम स्पर्धेत विजेतेपद तर महिला कॅरम स्पर्धेत उपविजेते प्राप्त केले. शासकीय तंत्रनिकेतन, मुर्तीजापूरची चमु पुरुष क्रिकेट स्पर्धेत उपविजेती ठरली तर शासकीय तंत्रनिकेतन,अचलपूरचे पुरुष बुध्दिबळ स्पर्धेमध्ये उपविजेते प्राप्त केले. शासकीय औषनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या चमुने महिला बुध्दिबळ स्पर्धेमध्ये उपविजेते प्राप्त केले.
अशाप्रकारे विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयाने अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी क्रिडा महोत्सवाचे आयोजन करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रिडा गुणांना प्रोत्साहन देण्यात पुढाकार घेतल्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी आनंद व्यक्त करीत आहेत.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा