अमरावतीत 1 ते 3 फेब्रुवारी
दरम्यान
दिव्यांग
मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा
Ø राज्यभरातील 3 हजारांहून अधिक स्पर्धक
सहभागी
अमरावती, दि.31 :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय, क्रिडा संचालनालय आणि
मासोदची सत्यशोधक बहुउद्येशिय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 ते 3
फेब्रुवारी दरम्यान दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन विभागीय
क्रिडा संकुल येथे करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभ 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 1.00
वाजता असून स्पर्धेचा समारोप दि. 3 फेब्रुवारी रोजी राज्याचे सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे
यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. समारोप समारंभात स्पर्धेत प्राविण्य
मिळविलेल्या दिव्यांग मुला-मुलींचे यथोचित कौतुक व पारितोषिक वितरण होणार आहे.
या क्रीडा
स्पर्धेमध्ये दृष्टीबाधित(अंध), मतीमंद, मुकबधीर, अस्थिव्यंग व बहुविकलांग
प्रकारातील राज्यातील तीन हजाराहून अधिक विद्यार्थी विविध खेळ प्रकारामध्ये सहभागी
होत आहे. या स्पर्धेमध्ये लांब उडी, उंच, गोळाफेक, बुध्दीबळ, धावणे, पोहणे,
व्हिलचेअर रेसिंग, पासिंग द बॉल इत्यादी प्रकारचे विविध खेळात सर्व दिव्यांग
प्रवर्गातील खेडाळु आपले कौशल्य प्रदर्शित करणार आहेत. अमरावती येथे आयोजित
करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभाग मंत्री राजकुमार बडोले यांच्या शुभहस्ते दि. 1 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी
1.00 वाजता होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उद्योग, खनिकर्म,
पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील
उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचेसह कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ.
रणजित पाटील, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा आमदार डॉ. सुनील
देशमुख, शिक्षण हक्क परिषदचे उपाध्यक्ष तथा आमदार डॉ. श्रीकांत देशपांडे, महापौर
संजय नरवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार
रामदास तडस, आमदार सर्वश्री विरेंद्र जगताप, ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू, रमेश
बुंदिले, डॉ. अनिल बोंडे, प्रभुदास भिलावेकर, रवि राणा, श्रीमती यशोमती ठाकुर
उपस्थित राहणार आहेत.
विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख,
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा खत्री, मनपा आयुक्त संजय निपाणे, क्रिडा व
युवक सेवा उपसंचालक श्रीमती प्रतिभा देशमुख, सत्यशोधक बहुउद्येशिय शिक्षण संस्था,
मासोदच्या (चांदुरबाजार) अध्यक्षा सौ. नयना कडू आदींचे या क्रीडा स्पर्धेच्या
आयोजनाकरीता विशेष सहयोग मिळाला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे
प्रधान सचिव दिनेश वाघमारे व अपंग कल्याण आयुक्तालय पुणेचे आयुक्त बालाजी मंजुळे
यांच्या मार्गदर्शनात क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावती येथे प्रथमत: आयोजित दिव्यांग मुला-मुलींच्या
राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी क्रीडा
स्पर्धेला तसेच सायंकाळी 6.00 आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाकरीता जास्तीत जास्त
संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक
उपायुक्त विजय साळवे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा