बुधवार, २३ जानेवारी, २०१९

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री गिरिष बापट यांचे हस्ते लोह व आयोडिन युक्त मीठाचे वितरण


अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक  मंत्री गिरिष बापट यांचे हस्ते
लोह व आयोडिन युक्त मीठाचे वितरण
अमरावती, दि. 23 : अमरावती शहरातील शिद्यापत्रिकाधारकांना लोह व आयोडीन युक्त मीठ टाटा ट्रस्टच्या सहाय्याने रास्त भाव दुकानातून वितरीत करण्याबाबत दि. 5 ऑक्टोंबर च्या शासन नियमानुसार निर्देश देण्यात सूचित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने दि. 21 जानेवारी रोजी सांयकाळी शहरातील मालटेकडी रोड स्थित अग्रवाल रास्त भाव दुकान परिसरात अन्न,नागरी पुरवठा विभाग व टाटाट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लोह व आयोडीन मीठाचे वितरण समारंभ आयोजि करण्यात आला होता.
या वितरण समारंभांत शिद्यापत्रिकाधारंकांना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरिष बापट यांचे हस्ते लोह व आयोडीन युक्त मीठाचे वाटप करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार डॉ. सुनील देशमुख, पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, निरिक्षण अधिकारी संजय आवरे, खरेदी अधिकारी उमेश खोडके आदी उपस्थित होते.
श्री. बापट म्हणाले की, शिधापत्रिकाधारकांना लोह व आयोडिन युक्त मीठ रास्त भाव दुकानामधुन वितरीत करण्यात येत आहे. शहरातील रास्तभाव दुकानदाराकडुन हे मीठ 14 रुपये प्रती किलो प्रमाणे शिधापत्रिकाधारकांना व नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. सर्व लाभार्थी व नागरीकांना सदर मीठाचा वापर आपल्या दैनंदिन आहारात केल्याने आरोग्य अधिक चांगले राहील. तसेच विशेषत, स्त्रियांनी या मीठाचा दैनदिन आहारात वापर करावे, असे आवाहनही श्री. बापट यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला शहरातील नागरीक, रास्तभाव दुकानदार, लाभार्थी, अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
0000000
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा