एकात्मिक फलोत्पादन
विकास अभियानाचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा
कृषी विभागाचे
आवाहन
अमरावती, दि. 14 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात क्षेत्र विस्तार,
संत्रा पुनरूज्जीवन सामूहिक नियंत्रीत शेती, फलोत्पादन यांत्रिकीकरण, काढणीत्तोर व्यवस्थापन
आदी घटकांचा समावेश असून, या विविध योजनांचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांनी केले.
हळद
लागवडीसाठी लागवड खर्चाच्या 40 टक्के (हे. 12 हजार), दांड्याची फुले (कमाल 2 हे.) अल्पभूधारक शेतकरी एकूण
खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 ह. रू. प्रति हे, इतर शेतकरी एकूण खर्चाच्या 25 टक्के
किंवा कमाल 25 हजार रु प्रति हेक्टर, कंदवर्गीय फुले कमाल 2 हे. प्रति लाभार्थीसाठी
अल्पभूधारक शेतकरी एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार प्रति हे. इतर शेतकरी
एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 37 हजार 500 रू. प्रति हेक्टर, सुटी फुले कमाल
2 हे. प्रति लाभार्थीसाठी अल्पभूधारक शेतकरी एकूण खर्चाचा 40 टक्के किंवा 16 हजार प्रति
हे, इतर शेतकरी एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार रू. प्रति हेक्टर.
संत्रा पुनरूज्जीवन प्रति लाभार्थी 2.00 हे. मर्यादित
50 टक्के किंवा जास्तीत जास्त 20 हजार प्रति हेक्टर. अळिंबी उत्पादन प्रकल्पासाठी खर्चाच्या
40 टक्के किंवा रू.8 लाख/युनिट (बँक कर्जाशी निगडित), अळींबी बीज उत्पादन केंद्र स्थापन
करण्यासाठी खर्चाच्या 40 टक्के किंवा 6 लाख बँक कर्जाशी निगडित. मधुमक्षिका पालनासाठी
एकूण मापदंड रूपये 2 हजार प्रति मधुमक्षिका संच यांच्या 40 टक्के रक्कम रु. 800 प्रति संच या मर्यादेत जास्तीत जास्त
50 मधुमक्षिका संचासाठी अर्थसाह्य देय राहील.
सामुहिक
शेततळे व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी मापदंडानुसार साह्य मिळते.
नियंत्रीत शेती
हरितगृहासाठी खर्चाच्या
50 टक्के, शेडनेट हाऊससाठी खर्चाच्या 50 टक्के, पॉली हाऊस लागवड साहित्य भाजीपालासाठी
खर्चाच्या 50 टक्के व इ. प्लॉस्टीक मल्चिंगसाठी 16 हजार रू. प्रति हेक्टर.
फलोत्पादन यांत्रिकीकरण
ट्रॅक्टर 20 एचपीसाठी
रु. 1 लाख प्रति युनिट (अनु.जाती व जमाती, महिला, लहान व सीमांत शेतकरी 75 हजार प्रति
यूनिट सर्वसाधारण प्रवर्ग. पॉवर टिलर 8 एच
पी पेक्षा जास्तसाठी 75 हजार रू. प्रति यूनिट
पॉवर टिलर 8 एचपीपेक्षा कमी असल्यास 40
हजार प्रतियुनिट व अनु. जाती व जमाती, महिला, लहान व सीमांत शेतक-यासाठी 50 हजार
रू. प्रतियुनिट)
काढणीत्तोर व्यवस्थापन
प्राथमिक
प्रक्रिया केंद्र सर्वसाधारण क्षेत्र 40 टक्के, शीतखोली 30 मे. टन क्षमतासाठी प्रकल्प
खर्चाच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त 5.25 लाख रू., पूर्वशीतकरण गृह (6 मे. टन क्षमता)
प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के जास्तीत जास्त 8.75 लाख रू., एकात्मिक पॅक हाऊस 9x18 साठी
प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के जास्तीत जास्त 17.50 लाख रू., शीतगृह अधिकतम 5000 मे. टन
क्षमतेसाठी प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के जास्तीत जास्त 1 कोटी 40 लाख. एकात्मिक शीतसाखळीसाठी
प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के, रेफ्रिजेटर व्हॅन 4 ते 9 मे.टन क्षमतेसाठी प्रकल्प खर्चाच्या
35 टक्के जास्तीत जास्त 9.10 लाख रू., रायपनिंग चेंबर अधिकतम 300 मे. टन क्षमतेसाठी
प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के, फिरते विक्री केंद्र (राज्य/राष्ट्रीय महामार्गालगत शेतकरी/शेतकरी
गटासाठी) खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 15 हजार, कांदाचाळीसाठी खर्चाच्या
50 टक्के किंवा जास्तीत जास्त 3 हजार 500
रू. प्रति मे. टन (152025 मे. टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी), पॅक हाऊससाठी खर्चाच्या
50 टक्के साह्य मिळेल.
योजनेत
लाभ घेण्यास इच्छुक अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login
वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधीत नजिकच्या
तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
श्री. सातपुते यांनी केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा