राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनी-सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी
यांचेकरिता सारधी संस्थेमार्फत क्षमता बांधणी प्रशिक्षण योजना
अमरावती, दि. 13 : शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या
उत्पादित मालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करणे ही शेती क्षेत्रापुढील जटील समस्या
आहे. या करिता शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीचे मार्गदर्शन व त्याआधारे निविष्ठा
पुरवठा करणे, उत्पादित मालाची विपणन व्यवस्था विकसित करणे, नाशवंत शेतमालाचे
प्रक्रियाकृत मालामध्ये रुपांतर करणे व कंपनीच्या माध्यमातून शेतक-यांना विविध
योजनांच्या लाभ मिळवून देणे या उद्देशाने सन 2011-2021 पासून राज्यात शेतकरी
उत्पादक कंपनी स्थापना करण्याची विगर राजकीय चळवळ मोठ्या प्रमाणात चालु झाली आहे.
शेतमालास योग्य दर मिळावा. शेतमाल प्रक्रिया उद्योग वाढावेत व शेतमालाची एकत्रित व
प्रक्रियायुक्त शेतमालाचे ब्रँडनेम विकसित होऊन शेती किफायतशीर व्हावी,
सद्यस्थितीत राज्यात नावार्ड. एस.एफ.ए.सी किंवा स्वतः काही शेतकऱ्यांनी मिळुन
सुमारे 6500 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केलेल्या आहेत.
परंतु,
त्यापैकी फक्त 16 टक्के (2040) शेतकरी उत्पादक कंपनी अत्यंत चांगल्या पद्धतीने
कार्यरत असल्याचे निर्दशनास येते, तर उर्वरित कंपनीचे कामकाज जेमतेम चालु असून
अनेक कंपन्या बंद स्थितीत आहेत. राज्यात 1250 शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकरी
सभासद संख्या 250 पेक्षा जास्त आहे. शासनाचा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचा मुख्य
उद्देश लहान व मध्यम शेतकऱ्यांचा आर्थिक उनतीसाठी काम करणे हा होता.
शेतकरी
उत्पादक कंपनी स्थापन केल्यानंतर केपनीची मुख्य उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून
संघटीतपणे प्रयत्न केल्यास या संस्था चांगल्या प्रकारे काम करू शकतात असे राज्यात
अनेक शेतकरी उत्पादक कंपनीनी सिद्ध केलेले आहे. कारण त्यांच्या स्थापनेपासून
कंपनीची वाटचाल कशी असावी याचे अचूक मार्गदर्शन नावाई. महाराष्ट्र स्पर्धात्मक
विकास प्रकल्प किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी मिळालेले आहे.
परंतु
राज्यात स्थापन झालेल्या अनेक कंपन्या शास्त्रोक्त मार्गदर्शनापासून वंचित आहे ही
वस्तुस्थिती आहे. त्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शनाची मोठी गरज आहे. ही गरज ओळखून व
त्यासाठी पुढाकार घेऊन सक्षम व शाश्वत कंपनी चालविण्यासाठी प्रशिक्षणाची सुविधा
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांनी
उपलब्ध केलेली आहे. सारथी हि संस्था महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी,
कुणबी-मराठा व मराठा-कुणयो या लक्षित गटातील समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक
परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. त्यामुळे
शेतकरी केंद्र बिंदु मानून शेतकरी कंपनीच्या लक्षित गटातील संचालक, मुख्य
कार्यकारी अधिकारी, प्रतिनिधिक सभासद यांच्यासाठी विनाशुल्क क्षमता बांधणी पाच
दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम योजना सन 2023-2024 साठी घोषित केलेली आहे.
या
संस्थेमार्फत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे
यांचेशी सहकार्य करार (MoU) केलेला आहे. सदर संस्था सहकारी संस्था व शेतकरी
उत्पादक कंपनी यांचे बळकटीकरण व सक्षमीकरणाचे काम राज्यात करीत आहे. या संस्थेकडे
प्रशिक्षण राबविण्याचा अनुभव व तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे.
योजना-
सारथी
लक्षित गटातील (मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी) शेतकरी उत्पादक कंपनी
संचालक, सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी राज्यातील विविध
जिल्ह्यामध्ये पाच दिवसीय निवासी प्रशिक्षणाची विनाशुल्क प्रशिक्षण सुविधा उपलब्ध
करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी कंपनीशी निगडीत विविध विषयतज्ञाचे मार्गदर्शन,
प्रशिक्षण साहित्य, चहा, नाश्ता, भोजन, निवास, क्षेत्रीय भेट व प्रमाणपत्र इत्यादी
बाबी चा समावेश आहे.
योजनेचे उद्देश व समाविष्ट विषय-
शेतकरी
उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट यांचे आदर्श व्यवस्थापन कसे करावे. शेतकरी उत्पादक
कंपनींना वित्त पुरवठा वैज्ञानिक प्रतिपूर्ती, कंपनीचे वित्तीय नियोजन व
व्यवस्थापन विकास आराखडा तयार करणे. कृषी माल निर्यातीमध्ये शेतकरी उत्पादक
कंपनींना वाव, संधी व कार्यप्रणाली. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून
सभासदांना शाश्वत निविष्ठा पुरवठा. बाजाराची गतिशीलता समजवुन घेणे. शेतकरी उत्पादक
कंपनीच्या माध्यमातून शेतमालाची ऑनलाइन विक्री व्यवस्था. कृषी मालाचे विपणन,
साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन, मुल्यसाखळी तयार करणे. शेतकरी उत्पादक कंपनी
सभासद विसंवाद, प्रशासन व लेखाकर्म, व्यवसायिक जोखीम व वित्तीय व्यवस्थापन, केंद्र
व राज्य पुरस्कृत शेतकरी उत्पादक कंपनीसाठी विविध योजना शेतकरी उत्पादक कंपनी
सक्षम व्हावी, तो शाश्वत चालावी व त्यामध्ये शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग असावा
यासाठी सारथी संस्थेमार्फत सन 2023-2024 या आर्थिक वर्षांसाठी वरील
उद्दीष्ट्यांच्या आधारे योजना कार्यान्वित केलेली आहे.
निवडीचे निकष
शेतकरी
उत्पादक कंपनी सभासद हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. प्रशिक्षणासाठी पात्र
व्यक्ती ही मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील असावी व
शेतकरी उत्पादक कंपनीची सभासद असावी. प्रशिक्षणासाठी पात्र लक्षित गटातील व्यक्ती
आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय (EWS) /नॉन क्रीमिलीयर गटातील असावी, अथवा सदर सभासद
शेतक-यांचे मागील ३ वर्षाचे वार्षीक उत्पन्न ह.रु. ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे.
याबाबतसंबंधित तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला असावा. उत्पादक कंपनीची कंपनी
कायदा 2013 नुसार Register of Company (ROC) कडे नोंदणी झालेली असावी. कंपनीच्या
भागधारकांची संख्या 50 पेक्षा कमी नसावी. शेतकरी हा नाबार्ड /किंवा इतर शासकीय
योजनेद्वारे प्रशिक्षणासाठी अनुदान प्राप्त शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद नसावा.
एका कंपनीतील जास्तीत-जास्त पाच व्यक्ती प्रशिक्षणासाठी सहभागी होऊ शकतात.
अर्ज प्रक्रिया-
प्रशिक्षणासाठी
विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज www.sarthi-maharashtragov.com व www.mahamcdc.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकरी उत्पादक
कंपनीच्या माध्यमातुन प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर
करणे बंधनकारक आहे.
प्रशिक्षणार्थी निवड-
शेतकरी
उत्पादक कंपनीद्वारे प्राप्त अर्जापैको मुल्यांकनाद्वारे अधिक गुणांक प्राप्त
करणाऱ्या राज्यातील फक्त प्रथम 192 शेतकरी उत्पादक कंपनीच्या लक्षित गटातील
संचालक/सभासद/ मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सन 2023-2024 मध्ये प्रशिक्षणासाठी
निवड करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाचे ठिकाण-
पुणे,
नाशिक, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, नागपुर, दापोली जि-रत्नागिरी
प्रशिक्षण
पूर्ण केलेल्या शेतकरीउत्पादक कंपनींना पुढील दोन वर्षे निशुल्क मार्गदर्शन
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मार्फत करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधितांना
व्यवसायिक संधी उपलब्ध करून देणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, निविष्ठा पुरवठा,
मार्केट लिंकेजेस, इक्विटी ग्रॅन्ट, प्रोपोझल, शेतकरी उत्पादक कंपनी निगडीत योजना,
बँक व वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्धता, शेतकरी उत्पादक कंपनीशी निगडीत शासकीय
अधिकारी इतर स्टेक होल्डर यांच्या मध्ये समन्वय साधने इत्यादी सेवा पुरविण्यात
येणार आहे. अवश्यकता असल्यास या संस्थांना कालानुरूप विविध नाविन्यपूर्ण विषयाचे
पुन्हा पुढील आर्थिक वर्षात शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रगतीच्या आधारे
प्रशिक्षणाची अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी छत्रपती शाहू
महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे व महाराष्ट्र सहकार विकास
महामंडळ, पुणे यांच्या वतीने या योजनेचा अधिकाअधिक लाभ शेतकरी उत्पादक कंपनींनी
घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे, असे व्यवस्थापकीय संचालक, श्री. अशोक काकडे
भाप्रसे, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे
यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा