बुधवार, ७ जून, २०२३

सेवा हक्क आयोगाबाबत उपसचिवांची आकाशवाणीवर मुलाखत

 

सेवा हक्क आयोगाबाबत उपसचिवांची आकाशवाणीवर मुलाखत

अमरावती, दि. 7: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, तसेच सर्वसामान्य नागरिकांना याबाबतची सर्व माहिती व्हावी यासाठी अमरावती विभाग राज्य सेवा हक्क आयोगाचे उप सचिव, अनिल खंडागळे यांची अकोला आकाशवाणीवर दि. 9 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता मुलाखत प्रसारित होणार आहे.

मुलाखतीमध्ये अधिनियमातील तरतूदी, अधिसुचित सेवाबाबतची माहिती, सेवा पुरविणाऱ्या पदनिर्देशित अधिकारी यांची तपशीलवार माहिती, तसेच सेवा उपलब्ध न झाल्यास त्यानुषंगाने  कोणाकडे दाद मागावी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. या अधिनियमान्वये कोणकोणत्या सेवा अधिसूचित आहेत. त्या कोणकोणत्या घटकांच्या उपयुक्त आहेत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.  या सेवा  प्राप्त  करुन  घेण्याची  तांत्रिक   कायदेशीर  बाबींवर  चर्चा  करण्यात  आली आहे. आपले सरकार पोर्टलचा वापर सर्वसामान्य नागरिकांना सेवा प्राप्त करण्यासाठी  करावा  असे  आवाहन  करण्यात  आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची सर्वसामान्यांना माहिती व्हावी, सर्व नागरिकांना त्याचा फायदा व्हावा व त्यांच्यामध्ये या कायद्याबाबत जागरुकता उत्पन्न व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत, असे श्री. खंडागळे यांनी सांगितले. 

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा