अंगणवाड्यांत चिमुकल्यांनी आज केली योग
प्रात्यक्षिके
अमरावती, दि. 21 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अंगणवाडी
केंद्रांतील चिमुकल्यांनी योग प्रात्यक्षिके करून आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला.
जिल्ह्यातील
अंगणवाडी केंद्रांमध्ये योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. मन आणि शरीर
यांचे संतुलन साधण्यासाठी योग उपयुक्त आहे. त्यादृष्टीने नव्या पिढीवर योगसंस्कार
करण्याच्या हेतूने अंगणवाड्यांतही हा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत
पंडा यांच्या मार्गदर्शनानुसार महिला व बालविकास विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात
आला.
हा
उपक्रम राबविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले. अंगणवाडी ताई आणि पर्यवेक्षिका
यांना योगाबाबतचे मार्गदर्शनपर व्हिडिओ पाठविण्यात आले. अंगणवाड्यांतील बालकांच्या
माध्यमातून त्यांच्या कुटुंबापर्यंत योगाचे महत्व पोहोचविण्याचाही उद्देश होता,
असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बालविकास
प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका आणि विस्तार अधिकारी यांनी विविध अंगणवाड्यांत
उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला. अनेक केंद्रांमध्ये पालकही उत्स्फूर्तपणे
सहभागी झाले.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा