वन विभागातर्फे जैवविविधता दिवस साजरा
अमरावती, दि. 22 : जैवविविधतेबाबत जागरुकता वाढविण्यासाठी ‘युनो’तर्फे 22 मे रोजी आंतरराष्ट्रीय जैविविधता दिवस जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्त अमरावतीत वनविभागातर्फे ‘जैवविविधता समृद्धी : करारापासून कृतीपर्यंत’ या विषयावर कार्यक्रम झाला.
मुख्य वनसंरक्षक जी. के. अनारसे अध्यक्षस्थानी होते. वनराईचे अध्यक्ष मधु घारड,, मानद वन्यजीव रक्षक सावन देशमुख, डॉ. जयंत वडतकर, उपवनसंरक्षक अर्जुना.के. आर. अक्षय गजभिये, चंद्रशेखरन बाला, विभागीय वनअधिकारी.शरद करे आदींनी या कार्यक्रमात जैवविविधेचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. अमरावती वनवृत्ताअंतर्गत येणा-या अमरावती, अकोला, बुलडाणा, मेळघाट आदी प्रादेशिक विभागातील अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार यावेळी करण्यात आला.
संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यासाठी वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांना आहारातील भरडधान्याचे महत्व पटवून देण्यासाठी भरडधान्याचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले. सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांनी आभार मानले.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा