विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी
शिक्षण मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती
संपर्कसाठी भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर
अमरावती, दि. 2 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10वी) ची लेखी परीक्षा दि. 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आली होती.
सदर परीक्षेचा निकाल दि. 2 जून, 2023 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला असून निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने समुपदेशकांचे भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे देण्यात आले आहे.
7386400970, 8308755241, 9834951752, 8421150528, 9404682716, 9373546299, 8999923229, 9321315928, 7387647902 , 8767753069
वरीलप्रमाणे समुपदेशकांचया भ्रमणध्वनी क्रमांकावर परीक्षेच्या निकालापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करण्यात येईल. याची विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे राज्य मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा