8 मे रोजी शिकाऊ उमेदवार भरती मेळावा
अमरावती, दि. 5 : पीएम नॅशनल ॲप्रन्टशिप मेला (पीएमएनएएम) अंतर्गत 8 मे रोजी, सकाळी 10 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या एनएनएस सभागृहात शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार भरती मेळाव्यात नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व व्यवसायातील आयटीआय उत्तीर्ण तसेच परीक्षेस बसलेले प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आवश्यक मुळ कागदपत्रे व बायोडाटासह या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.के.बोरकर व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर. जी. चुलेट यांनी प्रसध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा