‘नशामुक्त भारत’ पंधरवड्यात ‘हसतखेळत व्यसनमुक्ती’बाबत मार्गदर्शन
अमरावती,दि. 22 : समाजकल्याण विभागातर्फे नशामुक्त भारत पंधरवड्यात केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे निवृत्त अधिक्षक व लेखक जी. बी. देशमुख यांचे हसत खेळत व्यसनमुक्ती या विषयावर व्याख्यान नुकतेच झाले.
प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, लेखाधिकारी विश्वास डाखोरे, विशेष अधिकारी राजेंद्र भेलाऊ, सहायक लेखाधिकारी राजेश रायकवार आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख यांनी आपल्या व्याख्यानातून सर्वांशी हसतखेळत संवाद साधत नर्मविनोदी शैलीत विषयाची प्रभावी मांडणी केली व उपस्थितांची मने जिंकली. व्यसनमुक्तीमुळे आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होऊन जीवन सुखमय व आनंदी होते. त्यामुळे स्वत: व्यसनमुक्त राहून इतर व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प करूया व सभोवताल सुंदर करूया, असे आवाहन त्यांनी केले.
नशामुक्त भारत अभियात सर्वांनी सहभागी होऊन सशक्त भारत निर्माण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी केले. मंगला देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. श्री. जाधवर यांनी आभार मानले.
प्रादेशिक उपायुक्त कार्यालय, सहायक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, तसेच सामाजिक न्याय भवन परिसरात असेलेल्या महामंडळातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा