मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध ‘तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समिती’ची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली.
राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचे प्राधान्य असून #तीर्थक्षेत्रविकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच भाविक-पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्यसुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. यावेळी शिखर समितीच्या बैठकीत सहा तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले,आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार धनंजय मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह सर्व संबंधित अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विकास आराखड्यांसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली तीर्थक्षेत्र :
‘श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव’ विकासासाठी ₹ १७२.२२ कोटींची तरतूद
‘संत तुकाराम महाराज जन्मस्थाना’च्या संवर्धनासाठी ₹ ४१.७१ कोटींची तरतूद
‘किल्ले अजिंक्यतारा’ जतन आणि संवर्धनासाठी ₹ १३४.८० कोटींची तरतूद
‘संगम माहुली (सातारा) समाधी स्थळ’ संवर्धन प्रकल्पासाठी ₹ १३३ कोटींची तरतूद
‘श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास’ आराखडा (वेरुळ)साठी ₹ २१०.४५ कोटी तरतूद
‘श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर’ परिसर विकासासाठी ₹ ३०१.५४ कोटींची तरतूद
See less
.jpg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा