माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये ‘जनगणना २०२७ ची तयारी’ या विषयावर जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांची निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतलेली विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत दि. ५ ते ९ मे, २०२६ या कालावधीत रोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ (News on AIR) या मोबाईल ॲपवर प्रसारित होईल.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आणि महासंचलनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही प्रसारित होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा