#ताण विरहित जीवनासाठी सकारात्मक वृत्ती, मनाचे नियंत्रण, योग्य विचार आणि व्यवहारातील संतुलन आवश्यक असल्याचे मत लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राचे सुहास गुढाते यांनी ‘टेक-वारी २.०’ अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमात ‘तणाव व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात व्यक्त केले.
ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी अंतर्मनातील आवाज ऐकण्याची गरज आहे. दैनंदिन जीवनात प्रतिकूल व्यक्ती, परिस्थिती, नातेसंबंध, वाहतूक, प्रदूषण आणि महागाई यासारख्या अनेक घटकांमुळे निर्माण होणारा ताण गुंतागुंतीचा ठरतो. ताण हा केवळ दुःखाशी संबंधित नसून आनंदाच्या क्षणातही तो अनुभवण्यास येतो. माणूस हा शरीर आणि मन या दोन घटकांचा बनलेला असून ताणमुक्तीची गरज मनाला असते, असे सुहास गुढाते यांनी यावेळी सांगितले.
आंतरव्यक्ती संबंधांमधील मतभेद आणि अपेक्षा यादेखील ताणाचे महत्त्वाचे कारण ठरतात. कुटुंब हा ताणमुक्तीचा आधार असून प्रत्येकाने स्वतःचा स्वभाव आणि क्षमता समजून घेतल्यास ताण कमी करण्यास मदत होऊ शकते. कामाच्या ठिकाणी ताण येऊ नये म्हणून आपल्या क्षमतांचा, कौशल्यांचा विकास करणे गरजेचे असल्याचे सुहास गुढाते म्हणाले.
व्याख्यानास मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
.jpg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा