राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण #आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (#सीएसआर) उपक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक रुग्णालयांना अत्याधुनिक #वैद्यकीय उपकरणांची जोड मिळत असल्याने #आरोग्ययंत्रणा अधिक सक्षम होत असून यामुळे रुग्णांना जलद आणि अचूक सेवा देण्यास मदत होणार आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) च्या कार्पोरेट सामाजिक
उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत जुहू येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय
व डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात पूर्णपणे स्वयंचलित अत्याधुनिक
बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझर उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सविस्तर वृत्त :
https://mahasamvad.in/202415/
#CSR

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा