जनगणना २०२७ च्या घरयादी व घरगणनेतील स्व-गणना प्रक्रियेत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आपली माहिती संगणकाद्वारे एसई पोर्टल वर नोंदविली.
राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या कुटुंबाची माहिती जनगणना २०२७ च्या घरयादी व घरगणनेतील स्व-गणना प्रक्रियेत एसई पोर्टलवर नोंदवून जनगणनेच्या देशव्यापी स्व-गणना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे, तसेच जनगणना कार्य संचालनालयाचे सहसंचालक संतोष पायस यांनी मुख्य सचिव यांना स्मृतीचिन्ह दिले.
महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे यांच्या हस्ते गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनाही स्मृतिचिन्ह देण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा