सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२६

 


महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त

आयुक्त कार्यालयात अभिवादन

 


          अमरावती, दि. २६ : महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

          यावेळी अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) संजय जाधव, सहआयुक्त (रोहयो) वासंती माळी, तहसीलदार सुनीता झाडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महर्षी वाल्मिकी यांच्या साहित्यिक योगदानाचे आणि भारतीय संस्कृतीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण स्थानाचे स्मरण यावेळी करण्यात आले.

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा