विभागीय आयुक्त कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी
अमरावती, दि. १४ : भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आज अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नाझर आशिष अंबाडकर, सुरज पुनसे यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
00000
#PanditNehru
#JawaharlalNehru
#ChildrensDay
#amravati

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा