मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी २.०
पोर्टलवर अर्ज करावे- मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन
मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास
साधणे, मत्स्यव्यवसायाशी संबंधित लाभार्थ्यांना प्रोत्साहन देणे तसेच
मत्स्यव्यवसायाच्या विविध घटकांना योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य
शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून ‘मुख्यमंत्री
मत्स्यसंपदा’ योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र
मत्स्यव्यवसायिकांनी, मत्स्यपालकांनी, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तसेच
योजनेच्या विविध घटकांसाठी पात्र असलेल्या इतर लाभार्थ्यांना महाडीबीटी २.०
पोर्टलवर उपलब्ध असलेल्या योजनांची व घटकांची माहिती तपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज
सादर करता येणार आहे.
महाडीबीटी २.० पोर्टलच्या https://mahadbt2.maharashtra.gov.in/ या
अधिकृत संकेतस्थळावर नवीन नोंदणी करून महाआयडी तयार करावी व तद्नंतर उपलब्ध
खात्याद्वारे लॉगिन करावे. या योजनेची माहिती व पात्र घटक तपासून संबंधित घटकाची
निवड करत अर्जामध्ये माहिती भरावी. आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर
करावा. नंतर अर्ज क्रमांक व
पोचपावती जतन करून ठेवावी आणि वेळोवेळी अर्जाची स्थिती तपासावी. सीएमएमएसवाय योजनेंतर्गत अर्ज करण्यापूर्वी प्रथम https://nfdp.dof.gov.in/nfdp/#/ या पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीनंतर
आवश्यक माहितीची खात्री करावी. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
अर्ज भरतांना अडचण उद्भवल्यास
अर्जदारांनी संबंधित जिल्हा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, यांच्या कार्यालयाशी
संपर्क साधावा. सहाय्यक आयुक्त
मत्स्यव्यवसाय, श्री. पुंडकर यांची इमारत, पहिला माळा, अतुल मंगल कार्यालयाजवळ,
रुक्मिणी नगर, अमरावती- ४४४६०६. संपर्क
क्रमांक ०७२१-२६६२४२१ मो. ९०२२०२०७२५, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, जुने
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला, जुनी ग्रामीण भूविकास बँक यांची इमारत, दुसरा
माळा, अकोला-४४४००१. संपर्क क्रमांक
०७२४-२४२३१५५, मो. ७७४१०१९३२८, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय इमारत,
पहिला माळा, बस स्टँड समोर, धाड रोड, बुलढाणा-४४३००१. संपर्क क्रमांक ०७२६२-२४२२५४ मो. ८६६८२६७०८८, सहाय्यक आयुक्त
मत्स्यव्यवसाय, कोलटकर वाडी, ग्रीन पार्क कॉलनी, श्री. विसपुते यांची इमारत,
एलआयसी ऑफिसच्या पाठीमागे, वाशिम-४४४५०५. संपर्क
०७२५२-२९९३०३ मो. ८४५९५८११३३, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय
इमारत, पहिला माळा, मा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ-४४५००१. संपर्क
०७२३२-२४४३८८ येथे संपर्क साधता येणार आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा