रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

📍 *पुणे*
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, #घोडेगाव यांच्या वतीने आयोजित जनजातीय गौरव दिन कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत उपमुख्यमंत्री तथा #पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते #आदिवासी #रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या जनजातीय गौरव दिनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमानाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासह त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्ता, सावकारी आणि जमीनदारी व्यवस्थेविरोधात ऐतिहासिक ‘उलगुलान’ घडवून आणत आदिवासी समाजाच्या जमीन, हक्क आणि स्वाभिमानासाठी संघर्ष केला. त्यांच्या त्याग व संघर्षाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील भिल्ल, महादेव कोळी आणि गोंड समाजातील क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचेही स्मरण केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासन आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासह शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा शेवटच्या आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच, घोडेगाव येथील रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवामुळे आदिवासी खाद्यसंस्कृतीचे जतन होण्यासोबतच स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ आणि आर्थिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण, आदिवासी सेवक पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि पारधी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाच्या विचारांचा वारसा जपत आदिवासी संस्कृतीचा गौरव सर्वदूर पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे, खेड पंचायत समितीच्या सभापती गौरीताई मुऱ्हे उपस्थित होते.

#भगवानबिरसामुंडा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा