माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र आणि #दिलखुलास कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येत आहे.
‘
दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार, दि.१६, आणि मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन सुषमा जाधव यांनी केले आहे.
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘जनजातीय गौरव दिना’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनातर्फे ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
आदिवासी समाजाची सांस्कृतिक ओळख व अस्मिता जपत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण, वनहक्क, पेसा कायद्याची अंमलबजावणी आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. तसेच दुष्काळसदृश परिस्थितीत आदिवासी शेतकरी व कष्टकरी कुटुंबांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाचे प्रयत्न व आगामी नियोजन याबाबत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके हे या विशेष मुलाखतीत माहिती देणार आहेत.
#भगवानबिरसामुंडा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा