रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ थेट मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक प्रणालीमध्ये आपली माहिती अद्ययावत करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आणि फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे. 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक नोंदणी व पडताळणी पूर्ण असणे महत्त्वाचे आहे. फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी (नागरी सुविधा केंद्रात) आधार कार्ड व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकासह संपर्क साधावा.

ई-केवायसी किंवा फार्मर आयडी तयार करताना तांत्रिक अथवा अन्य अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी राज्य शासन आवश्यक सहकार्य करणार असून, शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन विभागाने केले आहे.

#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा