गुरुवार, २० जानेवारी, २०२२

पंडीत दीनद्याल उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावे

 

                 पंडीत दीनद्याल उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी

                               31 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती दि.20:- वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वंयम योजनेच्या धर्तीवर स्वंतत्र योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत धनगर समाजातील असे विद्यार्थी ज्यांना इयत्ता 12 वी नंतर तंत्रशिक्षण तसेच व्यवस्थायिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला परंतू शासकीय वसतीगृहामध्ये ज्यांना प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना भोजन निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि 31 जानेवारीपर्यंत आपले अर्ज समाज कल्याण कार्यालयात सादर करावे, असे समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करावे. या योजनेअंतर्गत शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश घेणे किंवा स्वंयम योजनेअतंर्गत थेट अनुज्ञेय रक्कमेचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील पात्रता पुर्ण केली असावी

विद्यार्थी हा धनगर समाजातील असावा.अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक आपले राष्ट्रीकृत बँक खात्याशी संलग्न करावे. विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा.

                                          विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निकष

विद्यार्थी हा इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.  लाभार्थी विद्यार्थ्याला इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टकके गुण मिळालेले असावे. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. विद्यार्थ्यांची महाविद्यालयात उपस्थिती 60 टक्के असावी. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यप्राप्त महाविद्यालयात, संस्थेमध्ये व मान्यता प्राप्तअभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांस प्रवेश मिळालेला असावा.

                                                        00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा