मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत (रामेती) कारागिरांना रोजगाराची संधी उपलब्ध ईच्छूकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करावी

 

                     प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत (रामेती)

                                              कारागिरांना रोजगाराची संधी उपलब्ध

                                   ईच्छूकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करावी

 

 

    अमरावती, दि. 18 : प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) ही कृषि विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था आहे. संस्थेचे कार्यालय कृषि संकुल, विद्यापीठ रोड, कॅम्प अमरावती येथे एक एकर क्षेत्रात स्थापीत आहे.

या संस्थेच्या आवारात प्रशिक्षणार्थ्यासाठी दोन वसतीगृहे, खानावळ, प्रशिक्षण संकुल व इतर इमारती आहेत. या इमारती मधील विद्युत यांत्रीकीची (इलेक्ट्रीशियन) कामे, परिसरांमधील इमारतीच्या नळजोडणी, पाणीपुरवठा यंत्रणेतील बिघाडाची दुरुस्ती, नविन पाईप जोडणी इत्यादी कामासाठी नळजोडणी कारगीर (प्लंबर), इमारतीच्या खिडक्या, दरवाजे, फर्निचरची दुरुस्ती व नुतनिकरणाच्या कामासाठी सुतार काम करणारे कारागीर तसेच या संस्थेत लोखंडी गेट, ग्रिल्स, लोखंडी शेड व इतर लोखंडी साहित्यांची जोडणी दुरुस्ती करण्याच्या कामासाठी वेल्डींग काम करणारे कारागीर, संस्थेत असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या किरकोळ दुरुस्ती व नूतनिकरणासाठी गंवडी काम करणारे कारागीर, संस्थेतील इमारतीस रंगरंगोटी करण्यासाठी रंगकाम करणारे कारागीराच्या सेवांची गरज भासते, विशेषत: इलेक्ट्रीशियन व प्लंबीग कामासाठी दैनंदिन मजूरी दराने तसेच मासिक देखभाल व दुरुस्तीसाठी सुध्दा अनुभवी, प्रशिक्षीत व नोंदणीकृत कामगारांची गरज भासते. त्या अनुषंगाने या कामामध्ये कौशल्य प्राप्त, प्रशिक्षीत अनुभवी नोंदणीकृत गरज व इच्छूक कामगारांनी या संधीचा लाभ घ्यावा, रामेतीचे प्राचार्य विजय चवाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                इच्छूकांनी कामाचे स्वरुप, अटी व शर्तीबाबत माहिती कार्यालयीन कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत संस्थेत भेट देवून माहिती करुन घ्यावी. संबंधितांनी आपल्या कामाची दरपत्रके सिलबंध लिफाफ्यात सादर करावी. योग्य अनुभव कौशल्य, नोंदणी प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागद पत्राची पुर्तता व स्पर्धात्मक दर या आधारावर योग्य कारागीरांना सेवेची संधी उपलब्ध करुन देण्यात येईल, तरी इच्छूकांनी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क करावे, असे संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे.

 000000

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा