अत्याधूनिक साहित्याच्या
वापरामुळे
भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीची
प्रक्रिया जलद व अचूक
अमरावती दि 12: भूमि अभिलेख
विभागाकरीता गौण खनिज अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामाकरीता ३६ लक्ष २१ हजार
रुपयांचा निधी रोव्हर मशिन युनिट, लॅपटॉप व प्लॉटर व अनुषंगीक साहित्य खरेदी करीता
वितरीत करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर,
सहाय्यक आयुक्त श्यामकांत म्हस्के, उपसंचालक (भूमि अभिलेख) विलास शिरोळकर, उपजिल्हाधिकारी
(महसुल) रणजित भोसले, कार्यालय अधीक्षक निशांत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनामुळे
हे अत्याधूनिक साहित्य प्राप्त झाले असून त्यामुळे भूमापन प्रक्रियेत अचूकता व
गतिमानता निर्माण होणार आहे.
जिल्ह्याकरीता रोव्हर मशिन युनिट व
लॅपटॉप व अनुषंगीक साहित्य खरेदी करण्यात आले असून या हे साहित्य उप अधीक्षक भूमि
अभिलेख चिखलदरा, उप अधीक्षक भूमि अभिलेख अचलपुर कार्यालयास पुरविण्यात आले असून तेथील
कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
रोव्हर मशिन व इतर
साहित्यामुळे मोजणी प्रक्रियेतील अडचणी दुर होणार आहेत.
या साहित्याच्या वापरामुळे भूमि
अभिलेख विभागाकडुन करण्यात येणारी मोजणीची कार्यवाही सुलभ व जलदगतीने होणार असून
त्यामुळे वेळेची बचत होईल. जमीनीच्या हद्दीमुळे
वारंवार आपसांत होणारे तंटे यामुळे कमी होतील. शेती/प्लॉट यांच्या मोजणी प्रकीयेत पारदर्शकता
व अचुकता निर्माण होईल. जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र जास्त आहे. मोजणीसाठी पीक
शेतातुन निघेपर्यंत वाट पहावी लागते. हा कालावधी जुन ते जानेवारी असा असतो. या
कालावधीत प्रलंबित मोजणी प्रकरणांची संख्या वाढते. रोव्हर व CORS Stations वापर
सुरु झाल्यास मोजणी प्रक्रीयेतील अडचण दुर झाली आहे. मोजणी प्रकीया सुलभ व तात्काळ
होणार असल्याने एकाच दिवशी अनेक प्रकरणात मोजणी करत येणार आहे त्यामुळे मोजणी
प्रकरणांची प्रलंबितता राहणार नाही. गावठाण भूखंड वाटप पूर्नवसन भूखंड वाटप या
योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणा-या भूखंडाची तात्काळ मोजणी करता येणार आहे. अनुसुचित
जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००6 या अंतर्गत वाटप निर्गमित झालेले नियम २००८ स सुधारणा
नियम यानुसार (फॉरेस्ट कर्पामेंट) यांची मोजणी करुन 7/१२ करणे, अमरावती जिल्ह्यात वनखंडाची/वनहक्क दावेची
मोजणीची कार्यवाही करणे सुलभ होईल. अशी माहिती भूमि अभिलेखच्या जिल्हा अधीक्षक स्मिता
शहा, भूमापन विभाग कार्यालयाचे जगदीश जावळे यांनी दिली.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा