इयत्ता
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क माफ व परीक्षेच्या आदल्या
दिवशीपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची सुविधा
अमरावती दि.3:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत
मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेच्या दि.27 डिसेंबर 2021 ते दि.01
जानेवारी 2022 व इयत्ता बारावी परीक्षेच्या दि.19 डिसेंबर 2021 ते दि.28 डिसेंबर
2021 पर्यंत विलंब शुल्काने आवेदन पत्र भरणेबाबत तारखा जाहीर करण्यात आलेल्या
होत्या.
शैक्षणिक वर्ष 2022 च्या इयत्ता
दहावी व बारावी च्या परीक्षेसाठी
आवेदनपत्र भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येऊ नये तसेच विलंब
शुल्क माफ करण्यात यावे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑनलाईन
आवेदनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या अशा सुचना शासनाने एका
पत्राद्वारे दिल्या आहे.
त्याअनुषंगाने ही सुविधा
मार्च-एप्रिल 2022 या वर्षापुरतीच मर्यादित राहील. इयत्ता दहावीची परीक्षा दि.15
मार्च 2022 व इयत्ता बारावीची परीक्षा दि.4 मार्च 2022 पासून सुरु होत आहे. परीक्षेच्या
एक दिवस अगोदर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरण्याची सुविधा नियमित शुल्काने
उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
याबाबतची सर्व मुख्याध्यापक,
प्राचार्य, सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक,
विद्यार्थी, पालक व इतर संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा
ओक यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा