शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

मुलींच्या निरीक्षण गृहात सावित्रीबाई फुले जयंती निमित्त्‍ विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

मुलींच्या निरीक्षण गृहात

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त्‍ विविध कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती दि. 7:-  ३ जानेवारी रोजी क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोग विभागीय कार्यालयाच्यावतीने मुलींचे निरीक्षण गृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन सायबर क्राइम शाखेच्या पोलिस निरीक्षक सीमा दाताळकर उपस्थित होत्या. महिला व बाल विकासचे विभागीय उपायुक्त सुनील शिंगणे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री.गाडेकर तसेच महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात महिलां विषयक कायदे, आव्हाने या विषयांवर परिसंवाद, महिलांच्या संबंधी विविध विषयांवर पथनाटये, लघुनाट्य मुलींकरिता भाषण स्पर्धेचे आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. श्रीमती दाताळकर यांनी मुलींशी संवाद साधला. सायबर गुन्हे कसे घडतात, हे गुन्हे टाळण्यासाठी सावधगिरी कशी बाळगावी त्याबाबत माहिती दिली तसेच जिल्हा समन्वयक श्री.गाडेकर यांनी महिला आयोगाचे कार्याबाबत माहिती दिली व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधीक्षिका श्रीमती अरुणा गांधी तर आभार प्रदर्शन विधी सल्लागार श्रीमती रीना गुप्ता यांनी केले.

यावेळी महिला बाल विकासचे विभागीय उपआयुक्त, डॉ. उमेश टेकाळे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती प्रीती वाकोडे, लेखाधिकारी, एड.सीमा भाकरे आदी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा