गुरुवार, २० जानेवारी, २०२२

लसीकरण व वर्धक मात्रेनंतरही कोरोना त्रिसुत्रीचे पालन गांभिर्याने करावे

 

      लसीकरण व वर्धक मात्रेनंतरही कोरोना त्रिसुत्रीचे पालन गांभिर्याने करावे

                                                                -कर्नल विश्वास काळे                    

                           माजी सैनिकांनी घेतली कोरोना लसीची वर्धक मात्रा

अमरावती दि. 20:-  कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणाच्या दोन मात्रेनंतर वर्धक मात्रा घेणेही आवश्यक आहे. लसीकरण झाले म्हणून आपली जबाबदारी संपत नाही. ज्यांनी अद्याप लसीकरण करुन घेतले नाही त्यांना आपण लसीकरणाचे महत्त्व पटवुन द्यायला हवे. लसीकरण व वर्धक मात्रेनंतरही आपण सर्वांनी कोरोना प्रतिबंधीत नियमांचे, त्रिसुत्रीचे पालन गांभीर्याने करावे, असे आवाहन कर्नल विश्वास काळे यांनी केले.

शहरातील इसीएचएस पॉलीक्लिनीक येथे माजी सैनिकांसाठी नुकतेच लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या बुस्टर मात्रा या लसीकरण शिबीरात माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांना देण्यात आल्या.  यावेळी कर्नल विश्वास काळे (सेवानिवृत्त) यांच्यासह Echs प्रभारी अधिकारी कर्नल राम दयाल गोडे, वैद्यकीय अधिकारी कर्नल डॉ. शैलेश ओक, सुभेदार मेजर राणे (सेवानिवृत्त), व  इसीएचएस चे सदस्यगण आदी उपस्थित होते.

माजी सैनिकांना इसीएचएस पॉलीक्लिनीक येथे कोरोना लसीचे बुस्टर डोज देण्यात आले. माजी सैनिकांमधून हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर, 60 वर्षे पूढील जेष्ठांनी व सहव्याधीग्रस्तांनी कोरोना लसीची वर्धक मात्रा या आरोग्य शिबीरात घेतली. ब्रिगेडीअर विनय नायर (स्टेशन कमान्डर पुलगाव स्टेशन) यांचे मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या नियमानुसार लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराला माजी सैनिक व त्यांचे कुटूंबिय आदी उपस्थित होते.

                                            00000000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा