राष्ट्रीय
पशुधन अभियाना अंतर्गत
गवताचे गठ्ठे तयार करण्याचे मशीन
युनिट सुरु करण्यासाठी अर्ज सादर करावे
अमरावती दि.11:-जिल्ह्यात राष्ट्रीय पशुधन अभियानातंर्गत (विशेष घटक योजना) मुरघास
निर्मितीकरीता सायलेज बेलर मशीन युनिट (गवताचे गठ्ठे तयार करण्याचे मशीन वितरण)
स्थापनेसाठी निधी प्राप्त झाला आहे.
या योजने
अंतर्गत प्रत्येक तालुक्यातून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी मुरघास निर्मितीकरिता
सायलेज बेलर मशीन युनिट (गवताचे गठ्ठे तयार करण्याचे मशीन वितरण) स्थापनेसाठी अर्ज
संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावे. या योजनेचा लाभ
घेण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादनसंघ/ संस्था, शेतकरी उत्पादक
कंपनी/संस्था, स्वयंसहायता बचतगट, गोशाळा/पांजरापोळ या संस्थानी अर्ज करावे.
अधिक
माहीतीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयाच्या 0721-2662326 या
क्रमांकावर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यांच्या 0721-2662066 या
क्रमांकावर तसेच सबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा,
असे जिल्हा पशुसवर्धन उपआयुक्त यांनी कळविले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा