लेट डॉ. एस. एस. गडकरी
ॲन्युअल मेमोरिअल ॲवार्ड फॉर
इनोव्हेशन इन
पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन -2022
पुरस्काराकरीता 28
फेब्रुवारी पर्यंत अर्ज आमंत्रित
अमरावती दि.3:- ज्या अधिकारी, कर्मचारी यांच्या
प्रयत्नांमुळे कार्यक्षम, प्रभावी वेळोवेळी पारदर्शक, नागरिक केंद्रित आणि
नागरिकांच्या सार्वजनिक सेवेला विलंब न लावता त्यांचेसाठी विकसित केलेल्या कल्पना
ज्या शासनाच्या नियमांच्या आधारे कार्यन्वित करण्यात आलेली आहे. आणि सर्वांसाठी
फायदेशिर ठरलेली आहे. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना लेट डॉ. एस. एस. गडकरी ॲन्युअल
मेमोरिअल ॲवॉर्ड फॉर इनोव्हेशन इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 2022 या पुरस्काराने
गौरविण्यात येते. नामनिर्देशन करण्यात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचेबाबतीत
पुरस्कारासाठी निकष लावण्यात आलेले आहेत. प्रशस्तीपत्र व दहा हजार रुपये असे या
पुरस्काराचे स्वरुप असून पात्रता असलेल्या निकषांप्रमाणे सुयोग्य अधिकारी ,
कर्मचारी यांचे नामनिर्देश दि. 28 फेब्रुवारी 2022 पूर्वी भारतीय लोक प्रशासन
संस्थेकडे पाठवावयाचे आहे.
तसेच भारतीय लोक प्रशासन संस्थेमार्फत कै. श्री. बी. जी. देशमुख
वार्षिक निबंध स्पर्धा 2021-22 आयोजित करण्यात आली आहे. लेट डॉ. एस. एस. गडकरी
ॲन्युअल मेमोरिअल ॲवॉर्ड फॉर इनोव्हेशन इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 2022
पुरस्काराकरीता पात्रता निकषांनुसार आपल्या अधिपत्याखालील पात्र अधिकारी, कर्मचारी
यांचे नामनिर्देशन करावयाचे असल्यास परिपुर्ण माहिती मुख्यालयास पाठवावी, असे
संचालक (माहिती)(प्रशासन) गणेश रामदासी यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा