शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

इयत्ता बारावीच्या परीक्षेतील वेळापत्रकात बदल विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे मंडळाचे आवाहन

 

                   इयत्ता बारावीच्या परीक्षेतील वेळापत्रकात बदल

                    विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे मंडळाचे आवाहन

    अमरावती, दि. 21 : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च- एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा दि. 4 ते  30 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वेळापत्रक देण्यात आलेले आहे.

या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावी परीक्षेतील अर्धमागधी (विषय सांकेतांक 16) या विषयासह अन्य विषयांची परीक्षा  दि. 7 मार्च 2022 रोजी दुपारच्या सत्रात दुपारी 3 ते 6.30 वाजेपर्यत आयोजित करण्यात आलेली आहे. तथापि या विषयांपैकी फक्त अर्धमागधी या विषयाच्या वेळापत्रकामध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे.

   अर्धमागधी या विषयाची परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार दि. 8 मार्च 2022 रोजी दुपारच्या सत्रात 3 ते 6.30 वाजेपर्यत घेण्यात येणार आहे. अर्धमागधी या विषयाव्यतिरीक्त परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील करण्यात आलेल्या बदलाची संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी, असे विभागीय सहसचिव तेजराव काळे  यांनी कळविले आहे.

0000000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा