विभागीय आयुक्त कार्यालयात राजमाता जिजाऊ
आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
अमरावती दि 12: राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्य विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्य आयोजित विशेष कार्यक्रमात संजय पवार उपायुक्त (सा.प्र.), श्यामकांत म्हस्के सहा.आयुक्त (भूसुधार), विवेकांनद काळकर सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग), तहसिलदार वैशाली पाथरे उपस्थित होते. यांनीही यावेळी पुष्प अर्पण करुन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकांनद यांच्या प्रतिमेस वंदन केले. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा