रविवार, ९ जानेवारी, २०२२

विभागीय लोकशाही दिन ऑनलाईन पध्दतीने होणार

 

 

                         विभागीय लोकशाही दिन ऑनलाईन पध्दतीने होणार

 

           अमरावती दि. ९ :  विभागीय लोकशाही दिन दि. १० जानेवारी रोजी सकाळी ११वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे.

              कोरोना प्रतिबंधक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर लोकशाही दिनाचा कार्यक्रम ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संबंधित नागरिकांनी, तक्रारकर्त्यांनी विभागीय लोकशाही दिनामधील तक्रारी ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात. तक्रारकर्त्यांनी विभागीय लोकशाही दिनामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

               सामान्य नागरीकांनी त्यांच्या विभागीय लोकशाही दिनासंबंधी तक्रारी पोस्टाद्वारे, तसेच dcgamravati@gmail.com किंवा dcg-amravati@diffmail.com या ई- मेलवर पाठविण्याचे आवाहन सामान्य प्रशासन उपायुक्त संजय पवार यांनी केले आहे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा