सोमवार, ३ जानेवारी, २०२२

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण 2021-22 पासून सुरु

 

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी

व्यवसाय शिक्षण 2021-22 पासून सुरु

 

अमरावती दि. 3: समग्र  शिक्षा अभियानातंर्गत माध्यमिक/ उच्च माध्यमिक स्तरावरील व्यवसाय शिक्षण या योजनेअंतर्गत सुधारीत अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून सुरु करण्यात येत आहे.  समग्र शिक्षा अंतर्गत राज्यात व्यवसाय शिक्षण माध्यमिक,उच्च माध्यमिक स्तर योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

   यानुसार शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इयत्ता नववी, अकरावी व शेक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता दहावी व बारावीचा सुधारित अभ्यासक्रम, विषय व विषयांचे कोड क्रमांक कळविण्यात आलेले असून सुधारित जॉब रोल अभ्यासक्रमानुसार माध्यमिक शालांत, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 2021 चे आयोजन होणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. तथापि इयत्ता नववी व अकरावीच्या मूल्यमापन योजनेमध्ये कोणताच बदल नसून परिपत्रकामध्ये नोंद केल्याप्रमाणे नववी व इयत्ता 11 वीसाठी मूल्यमापन योजना लागू राहील.

समग्र शिक्षा, मुंबई यांचेकडून शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून इयत्ता दहावी व इयत्ता  बारावी मध्ये राबविले जाणाऱ्या विषयांची यादी व इयत्ता नववी मध्ये सुरु होणाऱ्या नविन विषयांची यादी व पाठयपुस्तके प्राप्त झालेली आहेत. इयत्ता नववी ते बारावीच्या विषयांची नावे व नविन विषय कोड क्रमांक याचा तपशील मंडळाच्या संकेतस्थळावर आहे. या योजनेअंर्तगत असलेल्या व्यवसाय शिक्षण विषयांस मंडळाची वेगळी मान्यता शाळा/उच्च माध्यमिक शाळांनी घेण्याची आवश्यकता नाही. हा अभ्यासक्रम PSSCIVE संस्थेच्या www.psscive.nic.in या संकेत स्थळावर व मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in  या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

या संबंधित सर्व बाबी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांचे निदर्शनास आणून शाळांच्या सूचना फलकावर लावण्यात याव्या. याबाबत अहवाल विभागीय मंडळास सादर करावा. इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचा सुधारित अभ्यासक्रम, जॉब रोलनुसार मुल्यमापन आराखडे, प्रात्यक्षिक गुणदान योजना, घटकनिहाय गुणविभागणी इ. मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे डॉ. अशोक भोसले  यांनी कळविले आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा