रविवार, १६ जानेवारी, २०२२

श्री वल्ली गाण्याचे रीमेक करणाऱ्या कलावंताचा पालकमंत्र्यांकडून सन्मान

अमरावती,दि. 16 : श्री वल्ली गाण्याचे मराठी रिमेक करणाऱ्या कलावंताचा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी यथोचित सत्कार करत त्याच्या भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या अनपेक्षितपणे झालेल्या सत्कारामुळे विजय खंदारे हा कलावंत आणि त्याची पत्नी भारावून गेली.

पुष्पा या दाक्षिणात्य चित्रपटातील श्री वल्ली गाणे सध्या अतिशय धुमाकूळ घालीत आहे. मात्र ते अपेक्षा त्याचे मराठी रुपांतरण सध्या युट्युब वर अतिशय गाजत असून हे रूपांतर अमरावती जिल्ह्यातील निंभोरा बैलवाडी येथील  विजय खंदारे या तरुणाने केले आहे. सध्या दिवसा येथे राहणाऱ्या विजय खंदारे याच्या या कलागुणांचा गौरव करीत पालक मंत्री एडवोकेट ठाकूर यांनी त्यांची भेट घेतली.  पत्नी तृप्तीसह विजय खंदारे याचा सत्कारही केला. गरीबीतून आपले शिक्षण पूर्ण करीत नोकरीसाठी भटकणाऱ्या विजयने प्रसंगी शेंगा विकून अथवा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची गुजराण केली. याच दरम्यान त्याला टिक टॉकवर व्हिडिओ करण्याचा छंद लागला. त्याने केलेल्या विनोदी व्हिडिओना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्याने स्वतःचे युट्युब चॅनेल सुरू केले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अशा कलावंतांनी आपल्या कलागुणांची जोपासना करावी, असे आवाहन पालकमंत्री एडवोकेट ठाकूर यांनी केले आहे. विजयला त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास सहकार्य करण्याचे आश्वासनही एडवोकेट ठाकूर यांनी यावेळी दिले. एखाद्या कलावंताची कदर करीत त्याचा यथोचित सन्मान करणाऱ्या एडवोकेट ठाकूर यांच्या या कृतीमुळे विजय खंदारे आणि त्याचे कुटुंबीय भारावून गेले होते.

0000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा