कोविड
केअर मॅनेजमेंट प्रणालीचे पोर्टलवर कोरोना उपचारा बाबत
माहिती अद्ययावत करण्याबाबत प्रशिक्षण
अमरावती दि 12: कोविड केअर मॅनेजमेंट सिस्टीम पोर्टलवर कोरोना रुग्णालये, खाटा, ऑक्सिजनची उपलब्धता व औषधोपचाराबाबत सर्व माहिती अद्ययावत करण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. कोविड मॅनेजमेंट केअर सिस्टिम या पोर्टलवर राज्यातील कोविड संबंधी माहिती उपलब्ध व अद्ययावत करण्यात येत आहे. कोरोना आजारावर उपचार करतांना रुग्णालयात खाटांची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता, औषधांचा साठा या माहितीच्या अभावी रुग्णाच्या कुटूंबियांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. तातडीच्या वेळी रुग्णाला योग्य उपचार मिळावे यासाठी या पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध व अद्ययावत करण्यासाठी हे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. शासकिय व खासगी रुग्णालयांची कोरोना उपचारासंबंधी माहीती अद्ययावत करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी जिल्हाधिकारी आशिष बीजवल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शामसुंदर निकम, उपविभागीय अधिकारी नितिन व्यवहारे, आरोग्य विभागाचे अधिकारी व दुरदृश्य प्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
रुग्णावर कोरोनाचा उपचार करण्याचा
प्रसंग उद्भवल्यास नागरिकांनी पोर्टल वरील उपलब्ध माहीती जाणून घेण्यासाठी काही
तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यास हवी ती माहिती तात्काळ उपलब्ध होऊ शकेल व संबंधित रुग्णावर तातडीने उपचार करण्याबाबतचा
निर्णय घेणे सुलभ होईल.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा