स्वाधार योजना व सामाजिक न्याय विभागाच्या
वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास २८ फेब्रुवारी पर्यंत
मुदतवाढ
अमरावती दि. 7:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सर्व
शासकीय वसतीगृह कोरोना प्रादुर्भावामुळे काही काळ बंद ठेवण्यात आली होती. तसेच
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या दोन्ही योजनांचे अर्ज परिवहन सेवा
बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थी विहीत वेळेत अर्ज सादर करू शकले नाहीत.
विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेवुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे
विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्यास दि.२८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य सामायिक
प्रवेश परीक्षा (CET) मार्फत राबविण्यात येणाऱ्या काही विषयातील प्रवेश प्रक्रिया अद्याप
प्रलंबित आहेत. एल.एल.बी., बी. एड. यासारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशफेरी फेब्रुवारी
महीन्यापर्यंत सुरू राहणार असल्याचे सीईटी विभागाने कळवले असून त्यानुषंगाने
वसतिगृह प्रवेश किंवा स्वाधार योजना यातील लाभांपासून एकही पात्र विद्यार्थी वंचित
राहु नये. यासाठी ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.
अमरावती विभागातील
सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतीगृहातील प्रवेश व स्वाधार
योजना या दोन्हीसाठी अर्ज करण्यास देण्यात आलेल्या मुदतवाढ दि. २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पात्र विद्यार्थ्यांनी
विहीत वेळेत आपले अर्ज सादर करावेत असे अमरावती समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक
उपायुक्त सुनिल वारे यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा