रविवार, १६ जानेवारी, २०२२

कोरोना नियमांचे जबाबदारीने पालन करा -- ॲड. ठाकूर

 

कोरोना नियमांचे जबाबदारीने पालन करा -- ॲड. ठाकूर

अमरावती,दि. 16 : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल असतानाही विभागाचे काम चालूच ठेवणाऱ्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर आता प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळून काम करताना दिसत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी अमरावती शासकीय विश्रामगृहावर आज कार्यकर्ते आणि नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेतला तसेच जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेउन त्याच्यावर तोडगा काढला. मात्र, यावेळी भेटीसाठी आलेल्या सर्व नागरिकांना त्यांनी कळकळीची विनंती करीत राज्यसरकारने आखून दिलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. याची जाणीव करून दिली. विषेशत: लोकप्रतिनिधींनी ही जबाबदारी ओळखून त्या प्रमाणे पालन केले पाहिजे असेही ठाकूर यावेळी म्हणाल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा