सोमवार, १३ जुलै, २०२६
अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून ८४.२३ कोटींचा निधी मंजूर
• राज्यातील सहा महसूली विभागांतील
४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत
• अमरावती विभागातील २८ हजार ७५१
शेतकऱ्यांना ६८ कोटींची मदत
थेट बँक खात्यात 'डीबीटी' द्वारे जमा होणार
मदत निधी :
शासनाने स्पष्ट केले आहे की,
कोणतीही मध्यस्थी किंवा गैरव्यवहार टाळण्यासाठी सर्व बाधित शेतकऱ्यांना ही मदत थेट
लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. शेतकऱ्यांना
देण्यात येणारा हा मदतीचा निधी बँकांनी त्यांच्या जुन्या कर्ज खात्यात किंवा इतर कोणत्याही
वसुलीसाठी वळता करू नये, अशा कडक सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्व बँकांना देण्याचे
आदेश शासनाने दिले आहेत.
कोणत्या विभागाला किती निधी
मिळाला? (विभागीय आकडेवारी
शासनाने
जाहीर केलेल्या विवरणपत्रानुसार, राज्यातील विविध ६ विभागांना खालीलप्रमाणे निधीचे
वाटप करण्यात आले आहे :
अ.क्र.I विभाग I बाधित शेतकरी संख्या I एकूण बाधित क्षेत्र (हेक्टर) I मंजूर निधी
(रुपये लाखात)
१ अमरावती विभाग
(अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम) I २८,७५१ I ३०,३२५.१०
I ६,८०९.५५
२ नागपूर विभाग
(नागपूर, गोंदिया, वर्धा) I ७,४१३ I ३,४५०.२५ I ६०७.६५
३ नाशिक विभाग
(नाशिक, जळगाव, अहिल्यानगर) I ४,३९९ I २,३३७.६२ I ५२४.१२
४ पुणे
विभाग
(पुणे, सांगली, कोल्हापूर) I ३,२५९
I १,७६१.११ I ३७३.२०
५ छत्रपती
संभाजीनगर विभाग
(नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर) I ५९४ I ३४४.७५
I ७६.९९
६ कोकण विभाग
(रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग)
I ६२६ I १३९.८७ I ३२.१४
पारदर्शकतेसाठी विशेष अटी व शर्ती :
मदत वाटप प्रक्रियेत पारदर्शकता
राहावी आणि एकाच शेतकऱ्याला दुबार मदत मिळू नये (द्विरुक्ती टाळण्यासाठी), याची संपूर्ण
जबाबदारी संबंधित तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर सोपवण्यात आली आहे. तसेच,
एकदा मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील
जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
हा मदत निधी राज्य आपत्ती प्रतिसाद
निधीच्या निकष आणि दरानुसार मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला
या आर्थिक मदतीमुळे पुढील हंगामासाठी निश्चितच मोठा आधार मिळणार आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा