बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६


 ईद ए मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ईद ए मिलाद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला  ईद ए मिलाद हा सण त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. ईद ए मिलादच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः मुस्लिम बंधु - भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा