अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६
विभागीय आयुक्त
कार्यालयात
तक्रार नियंत्रण/निवारण
कक्ष स्थापन
अमरावती दि. ३० : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ
निवडणूक २०२६ च्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विभागीय
स्तरावर तक्रार नियंत्रण/निवारण कक्ष विभागीय आयुक्त कार्यालयात स्थापन करण्यात आला
आहे. तक्रारदारांना निवडणुकीसंदर्भातील तक्रारींची नोंद प्रत्यक्ष तक्रार निवारण कक्षात
तसेच ई-मेलद्वारेही करता येणार आहे. तक्रार निवारण कक्षाचा पत्ता नैसर्गिक आपत्ती कक्ष,
पहिला माळा, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग, अमरावती असा असून तक्रारींसाठी
ई-मेल: dycomm.amt@gmail.com
आणि दूरध्वनी क्रमांक : ०७२१-२६६१३६४ व टोल फ्री क्रमांक : १८००४२५२१६४ असा आहे.
यांची संबंधितांनी नोंद घ्यावी. असे विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त (आस्थापना)
अमरावती विभाग, अमरावती यांनी कळविले आहे.
०००००

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा