प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक जात वैधता प्रमाणपत्र विहित वेळेत मिळावे, यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय
राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे
यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ मध्ये इयत्ता ११
वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेले तसेच इयत्ता १२ वीतील व्यावसायिक अभ्यासक्रमास
प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी या मोहिमेचा लाभ घेऊ शकतील.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या
जमाती, विशेष मागास
प्रवर्ग, इतर मागास
प्रवर्ग, एसईबीसी आदी
प्रवर्गातील विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे प्रलंबित प्रकरणे
तातडीने निकाली काढण्यासाठी त्रुटीपूर्तता शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
त्रुटींची पूर्तता व आवश्यक कागदपत्रे
सादर करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार असून, यामुळे समित्यांचे कामकाज
अधिक गतिमान व लोकाभिमुख होऊन विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र
मिळण्यास मदत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा