गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२६

 

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या

पाच जागांचे निकाल जाहीर

 

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र विधानपरिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे अभिजित गोविंदराव वंजारी, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे कौस्तुभ मुरलीधर गावडे आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे किरण रामराव सरनाईक विजयी झाले. 

भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी या पाच मतदारसंघांतील द्विवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 23 ऑक्टोबर रोजी मतदान झाले.


27 ऑक्टोबरपासून सुरू झालेली मतमोजणी 29 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली. भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने सर्व पाच मतदारसंघांचे निकाल घोषित करण्यात आले.

मतदारसंघनिहाय निकाल

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख जाधव यांना 1,13,840 मते मिळाली. भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव यांना 1,03,912 मते मिळाली. 

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित गोविंदराव वंजारी यांना 67,231 मते मिळाली. भाजपचे सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना 63,960 मते मिळाली. 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना 85,876 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सतीश भानुदासराव चव्हाण यांना 67,752 मते मिळाली. 

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना 23,117 मते मिळाली. अपक्ष सचिन नवनाथ सानप यांना 13,347 मते मिळाली. 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण रामराव सरनाईक यांना 16,663 मते मिळाली. तर काँग्रेसच्या अदिती ऋषिकेश पोहरे यांना 8,636 मते मिळाली, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा