गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२६


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्यात #वर्धा जिल्ह्यातील #आर्वी येथे होणाऱ्या एफएमसीजी व पेयपदार्थ निर्मितीच्या अत्याधुनिक प्रकल्पासंदर्भात #सामंजस्यकरार करण्यात आला.


कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देऊन शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धनाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनी आर्वी येथे २,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पामुळे ५५० जणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पात फळांचे रस, पेयपदार्थ आणि दैनंदिन वापरातील ग्राहकोपयोगी वस्तूंच्या (एफएमसीजी) निर्मितीसाठी अत्याधुनिक उत्पादन युनिट उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम एप्रिल २०२७ पासून सुरू करण्याचे नियोजन आहे. या गुंतवणुकीमुळे स्थानिक शेतकरी, कृषीपूरक व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासह विदर्भातील औद्योगिक विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
यावेळी आमदार सुमित वानखेडे, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
See les
s

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा