शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

मुख्यमंत्री सहाय्यता निधी

 


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत मुंबई उपनगर जिल्ह्यात ८६९ रुग्णांना सुमारे ८ कोटी १० लाख ४४ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, सामंजस्य करार आदीमुळे रूग्णांना वेळेत अर्थसहाय्य होत आहे.
गरजूंनी या योजनेच्या लाभासाठी आणि अधिक माहितीकरिता १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाकडून करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा