माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची सिकलसेल ॲनिमिया या विषयावर आधारित विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत मंगळवार ७ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर पाहता येणार आहे. निवेदिका उन्नती जगदाळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा