बुधवार, २९ एप्रिल, २०२६

 





मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन #जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित क्षमतावाढीसंदर्भात #एनटीपीसी लिमिटेड व जलसंपदा विभाग यांच्यात सुधारित #सामंजस्यकरार करण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये १८०० मे.वॅ. वरून २६०० मे.वॅ. वाढ होणार आहे.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. कपूर यांनी कराराची माहिती दिली.
सामंजस्य करारासंदर्भात माहिती :

दिनांक ०३.०९.२०२४ च्या सामंजस्य करारानुसार,
➡️ स्थापित क्षमता (मे.वॅ) - अंबा उदंचन जल विद्युत प्रकल्प – ८०० मे. वॅ.
➡️कुंभे उदंचन विद्युत प्रकल्प – १००० मे. वॅ.
सुधारित सामंजस्य करारानुसार,

➡️पूरक पत्रानुसार सुधारित क्षमता : अंबा प्रकल्प – १५०० मे.वॅ., कुंभे प्रकल्प – ११०० मे.वॅ.
➡️पूरक पत्रानुसार मे. वॅ क्षमतेत होणारी (वाढ/घट) - अंबा प्रकल्प - ७०० मे.वॅ., कुंभे प्रकल्प - १०० मे.वॅ.

➡️पूरक पत्रानुसार एकूण क्षमता वाढ (मे.वॅ.) - अंबा प्रकल्प - ८०० मे.वॅ., कुंभे प्रकल्प – १०० मे.वॅ.
➡️ पूरकपत्रानुसार एकूण क्षमतेत वाढ- २६०० मे. वॅ.
#विद्युतप्रकल्प
#MoU

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा