माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांत राज्याच्या क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्षवेध’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाविषयी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे, मुंबई विभागाचे उपसंचालक नवनाथ फरताडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
#दिलखुलास कार्यक्रमातील ही मुलाखत मंगळवार ७ आणि बुधवार ८, एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही ही मुलाखत उपलब्ध राहणार आहे.
#जयमहाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार ८, एप्रिल २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर ही मुलाखत पाहता येणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका हर्षदा कुलकर्णी यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा